अॅड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर जिल्हा न्यायालयात भव्य सत्कार
सोलापूर बार असोसिएशनचे माजी सचिव तथा जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील अॅड. श्रीनिवास कटकूर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यास कायदे क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड. बसवराज सलगर (माजी अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन), अॅड. आकाश आयंची, अॅड. सूरज दुधगुंडी यांच्यासह अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते अॅड. मिलिंद थोबडे यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अॅड. थोबडे यांच्या सलग तिसऱ्या विजयाबद्दल अभिनंदन करत, हा विजय त्यांच्या न्यायव्यवस्थेतील योगदानाचा, वकिलांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि व्यापक जनसंपर्काचा सन्मान असल्याचे मत व्यक्त केले.
बार कौन्सिलवर सलग तीन वेळा निवडून येणे ही उल्लेखनीय कामगिरी असून, अॅड. मिलिंद थोबडे यांनी वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची ही पोचपावती असल्याचे मत अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी व्यक्त केले.
अॅड. मिलिंद थोबडे यांच्या ऐतिहासिक विजयामुळे सोलापूर जिल्हा न्यायालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातील विधिज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उपस्थितांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत, बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment