इंग्लिश चॅनेलला गवसणी घालणारी ‘जलपरी’ गीता मालुसरे आज भारतात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

इंग्लिश चॅनेलला गवसणी घालणारी ‘जलपरी’ गीता मालुसरे आज भारतात

 इंग्लिश चॅनेलला गवसणी घालणारी ‘जलपरी’ गीता मालुसरे आज भारतात



 

मुंबई (कटूसत्य वृत्त):-  जागतिक जलतरण क्षेत्रातील अत्यंत अवघड मानली जाणारी 'इंग्लिश खाडी' पोहून पार करण्याचा ऐतिहासिक पराक्रम करणारी कुमारी गीता महेश मालुसरे आज भारतात पुण्यात परत येत आहे. रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला 'जेलीफिश' या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला होता. तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. हात वाचवण्यासाठी व वेदनांवर मात करत त्यांना तब्बल ११ शस्त्रक्रिया सहन कराव्या लागल्या होत्या.आपले स्विमिंग करिअर संपले असे वाटत असताना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गीताने पुन्हा एकदा पाण्यात उतरून हा पराक्रम केला आहे. इंग्लडमध्ये प्रॅक्टीस करताना जेली फीशने पुन्हा एकदा गीताला दंश केला होता. सुदैवाने हा दंश विशारी नव्हता. मात्र इंग्लिश खाडीत पोहत असताना जुन्या जखमांच्या वेदना ठणकत होत्या, जीवघेण्या जेलीफिश दंशाचे मानसिक दडपणही होते, मात्र असह्य वेदनांना विसरून ती फक्त आपल्या ध्येयाकडे पुन्हा झेपावत राहिली.आपले लक्ष फक्त स्वप्नावर केंद्रित केले आणि अखेर तीने इतिहास रचला. इतका संघर्ष करून मिळवलेले हे यश जगाच्या पाठीवर खरोखरच एकमेवाद्वितीय आहे. गीताने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश जगभरात कौतुकास पात्र ठरले आहे.

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून पोहायला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी  ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी गीताने मुंबईतील प्राँग्ज लाइट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पोहून पार केले होते.  २०२२ मध्ये इस्त्राईलला झालेल्या स्पर्धेत दुसरी आली होती. रत्नागिरी मध्येही ती अपघात होऊनही दुसरी आली होती.

इंग्लिश चॅनेल पार करून यापुढे थांबायचे नाही असे गीताने ठरवले आहे. या वर्षी येणाऱ्या ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कमधील ४६ किलोमीटरची ‘ट्वेंटी ब्रिजेस’ आणि सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील ३२ किलोमीटरची ‘कॅटेलिना चॅनेल’ पार करण्यासाठी आत्ता सज्ज झाली आहे. गीताला जागतिक कीर्तीचा ‘क्वीन ऑफ ओशन’ (Queen of Ocean) हा बहुमान मिळवण्याचा आहे. जगातील सात प्रमुख खाड्या पोहायच्या असून, या ‘सेव्हन ओशन चॅलेंज’ स्वीकारण्यास तीने धडाक्यात सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages