गुरुपौर्णिमेनिमित्त नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये गुरूवंदन
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पुजन करुन करण्यात आली.यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, मार्गदर्शिका मीना पारखे उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंविषयी मनोगतातुन आदर व आभार व्यक्त केले.प्रमुख पाहुण्या अर्चना कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की गुरू हा आपल्या जीवनातील खरा मार्गदर्शक असतो.त्यांच्या सहवासाने आपले ज्ञान वाढते व जिवन सुखकर बनण्यास मदत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी व संस्थेच्या सचिवा सौ.वर्षाताई विभुते यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मृण्मयी गायकवाड हिने केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.png)
No comments:
Post a Comment