सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मोहोळमध्ये अतिक्रमणांवर हातोडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मोहोळमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

 सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मोहोळमध्ये अतिक्रमणांवर हातोडा





सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम मोहोळ शहरात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.

या कारवाईमुळे महामार्गालगतच्या अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पंढरपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेकडील बाजूस ही कारवाई करण्यात आली. महामार्गालगत ड्रेनेजच्या एंड पॉइंटपासून दोन मीटर अंतरातील जागा तसेच युटिलिटी झोनची जागा अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जागेवर विविध प्रकारची बांधकामे व इतर अतिक्रमणे करण्यात आली होती.

अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात संबंधित मालमत्ताधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा देऊनही संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेत पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाचे पथक मोहोळमध्ये दाखल झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. महामार्गालगतची जागा मोकळी करून वाहतूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेला परिसर खुला करण्यावर भर देण्यात आला.

या कारवाईदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर कार्यालयाचे अभियंता भोसले, मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. आगामी काळातही महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages