जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा -२०२६" अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा -२०२६" अभियान

 जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा -२०२६"  अभियान



 

सोलापूर जिल्ह्यात '*स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६' अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज केले. 

        जिल्हा परिषदेत आज विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक सिईओ कुशल यांचे अध्यक्षते खाली घेणेत आली. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांचे मार्गदर्शना खाली हे अभियान राबविणेत येत आहे. 
  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आपल्या जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६" हे वार्षिक अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना *"स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत"* अशी आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण स्वच्छता आणि लोकांचा सक्रिय सहभाग हा आहे. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर खालील प्रमुख घटकांचे तात्काळ नियोजन व अंमलबजावणी करण्यात यावी.
*स्वच्छतेची लक्ष्यित ठिकाणे (CTUs):* आपल्या तालुक्यातील अडचणीची, अस्वच्छ व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून, त्यांचे नकाशीकरण (Mapping) करावे आणि निश्चित कालावधीत ती पूर्णपणे स्वच्छ करावीत.
*शाळा व युवकांचा सहभाग:*        शाळांमध्ये "स्वच्छता ज्ञान यात्रा", घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि *"स्वच्छता आणि जल संचय संवाद"* यांसारखे उपक्रम राबवून जागृती करावी.
*सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान:* सफाई कामगारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. त्यांना पीपीई किट्स (PPE Kits) व सुरक्षा साधनांचे वाटप करून स्थानिक पातळीवर त्यांचा गौरव करावा.
*लोकसहभाग व विशेष उपक्रम:* कचरा वर्गीकरण मोहीम, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पर्यटन दिन (२७ सप्टेंबर) निमित्त विशेष उपक्रम घ्यावेत. तसेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष बैठकांचे आयोजन करावे.

*श्रमदान (१ ऑक्टोबर):* मागील वर्षाप्रमाणेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी देशव्यापी *"एक दिन, एक घंटा, एक साथ"* या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक. श्रमदानाचे आयोजन करावे.

*कचऱ्यातून समृद्धी:* "Waste to Wealth" (कचऱ्यातून संपत्ती) व "Waste to Art" (कचऱ्यातून कलाकृती) या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबवावेत.
*तात्काळ कार्यवाहीच्या बाबी:*
१. अभियानाचा सविस्तर तालुका पातळीवरील कृती आराखडा (Action Plan) त्वरित तयार करावा.
   2. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, बचत गट, युवक आणि प्रतिष्ठित नागरिकांना (उदा. ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक इ.) या मोहिमेत सक्रिय करून घ्यावे.
१. अभियानांतर्गत दररोज होणाऱ्या उपक्रमांची माहिती व फोटो स्वच्छता ही सेवा २०२६ च्या अधिकृत आयटी पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in) विनाविलंब दैनंदिन अपलोड करण्याची व्यवस्था करावी.
              *'स्वच्छता ही सेवा २०२६'* हे अभियान आपल्या तालुक्यात पूर्ण क्षमतेने, वेळेत आणि यशस्वीपणे राबविण्यात यावे.अभियानच्या अंमलबजावणीसाठी व यशस्वीतेसाठी त्वरित कार्यवाही सुरू करावी.
असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages