संग्रामनगर येथे साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज-संग्रामनगर येथील श्री साईबाबा ट्रस्ट मार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री साईबाबांच्या मूर्ती पहाटे दुग्ध अभिषेक व पूजा साईबाबा सेवा ट्रस्टचे सदस्य सौ.नीरजा व अजित श्रीनिवास राखले तसेच प्रा.सौ. दिपाली व रोहित चंद्रकांत कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तत्पूर्वी पहाटे हरिपाठ व साई चरित्र वाचन करण्यात आले. दुपारी मध्यान पूजा व आरती करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी शिवशंभो भजनी मंडळाचा भजन व भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळची आरती व नामजप करण्यात आला.यावेळी साईबाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किशोरसिंह माने-पाटील सचिव राजेंद्र आर्वे पूजा कमिटीचे अरुण राऊत, अजित माने,देवचंद ओसवाल, हनुमंत खडके,विजय टोंगळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे अकलूज मधील दत्त मंदिर शंकर महाराज मंदिर (संग्रामनगर) गोंदवलेकर महाराज मंदिर (लोणकर वस्ती) येथील दत्त मंदिर येथेही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले.तसेच महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, सदाशिवराव माने विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, शंकराव मोहिते महाविद्यालय या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

No comments:
Post a Comment