भाजपाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

भाजपाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड

 भाजपाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा; पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार


कोर्टी (कटूसत्य वृत्त) :- भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गणेश नागनाथ चिवटे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते चिवटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिवटे यांच्या निवडीमुळे सोलापूर पश्चिम ग्रामीण भागातील भाजप संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निवडीनंतर भावना व्यक्त करताना गणेश चिवटे म्हणाले की, गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माझे मार्गदर्शक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बूथ सक्षमीकरण, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे याला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षविस्तारासाठी काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages