आ. राजू खरे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

आ. राजू खरे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती

 आ. राजू खरे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती

मोहोळ मतदारसंघाला मिळाले महत्त्वाचे प्रतिनिधित्व



पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांची सोलापूर जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) अंतर्गत पुनर्गठित करण्यात आलेल्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा नियामक परिषदेचे सचिव भानुचंद्र कोलप्याक यांनी प्रदान केले आहे.

खान व खनिजे (विकसन व विनियमन) सुधारणा अधिनियम, २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील खाणबाधित क्षेत्रांचा विकास आणि तेथील नागरिकांच्या कल्याणासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यरत आहे. खाण क्षेत्रातून मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि अन्य विकासकामांना चालना देण्याचे काम या प्रतिष्ठानमार्फत केले जाते.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या १३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार आमदार राजू खरे यांची नियामक परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ते लोकप्रतिनिधी म्हणून सध्याच्या पदावर कार्यरत असेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कायम राहणार आहे.

या नियुक्तीमुळे मोहोळ मतदारसंघासह जिल्ह्यातील खाणबाधित भागांच्या विकासविषयक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, सोलापूरच्या वतीने आमदार राजू खरे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages