ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओचा कंटेनरला धडक,चालकाचा मृत्यू.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओचा कंटेनरला धडक,चालकाचा मृत्यू....

 ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओचा कंटेनरला धडक,चालकाचा मृत्यू....



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-      मोहोळहून टेंभुर्णीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरील कंटेनरला पाठीमागून सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सापटणे (टें) येथे जोरदार धडक दिली.या अपघातात स्कॉर्पिओ चालक करण महेश पवार  वय २२, रा. कुंभार गल्ली,भाजी मंडई, मोहोळ याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आंबुबाई देवकर,उज्वला देवकर,अश्विनी यांना किरकोळ दुखापत झाली असून अनिकेत धोतरे व रोहित हे गंभीर जखमी झाले आहेत.


           याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एन क्र. एमएच ४२ बीएन ५११२ ही गाडी मोहोळहून टेंभुर्णीकडे जात होती.सापटणे (टें) गावाच्या शिवारात बाबाराजे हॉटेलजवळ आल्यानंतर चालक करण पवार हा समोरील टिपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता.यावेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्कॉर्पिओची समोरील कंटेनरला पाठीमागून डाव्या बाजूने जोरदार धडक बसली.या धडकेत करण पवार गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याप्रकरणी आंबुबाई नवनाथ देवकर वय ५०, रा. कुंभार गल्ली, भाजी मंडई, मोहोळ यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश जगताप करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages