बार्शीच्या एमआयटी व्हीजीएस शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

बार्शीच्या एमआयटी व्हीजीएस शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 बार्शीच्या एमआयटी व्हीजीएस शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी





बार्शी (कटूसत्य वृत्त):- गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड स्रोत, संस्कारांचा शिल्पकार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गदर्शक. गुरुंप्रती आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे, या उद्देशाने एमआयटी व्हीजीएस शाळेत गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी श्लोक पठण व विशेष परिपाठाचे प्रभावी सादरीकरण केले. संस्कृत श्लोकांचे अर्थासह सादरीकरण करताना विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व उलगडून सांगितले. यावेळी गुरुपौर्णिमेवर आधारित भावस्पर्शी गीत व समूहनृत्य सादर करण्यात आले. विविध सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी गुरुंचे महत्त्व आणि त्यांच्या संस्कारांचे मूल्य प्रभावीपणे मांडले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी, "गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. जीवनात कितीही यश मिळाले तरी आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना सदैव जपावी." असे आवाहन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. यानंतर विद्यार्थांना गुरुमहतीवर आधारित श्लोकांची ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages