विकासाची‎ धुरा‎ आता आ.‎ देवेंद्र कोठे यांच्या‎ हाती- नगरसेवक किसन‎ जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

विकासाची‎ धुरा‎ आता आ.‎ देवेंद्र कोठे यांच्या‎ हाती- नगरसेवक किसन‎ जाधव

विकासाची‎ धुरा‎ आता आ.‎ देवेंद्र कोठे यांच्या‎ हाती- नगरसेवक किसन‎ जाधव



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर‎ शहरातील जुन्या कामगार चाळींवरील‎ बी-२ निर्बंध हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे‎ आमदार देवेंद्र‎ दादा कोठे यांचा सत्कार करण्यात‎ आला. यावेळी‎ सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक २२‎ चे‎ भाजपा नगरसेवक किसन जाधव‎ यांनी आमदार‎ देवेंद्र दादा कोठे यांचा‎ शाल‎ व‎ पुष्पगुच्छ‎ देऊन‎ सन्मान करत‎ त्यांच्या विकासाभिमुख‎ नेतृत्वाचा‎ गौरव‎ केला. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे‎ पाणीदार‎ आमदार‎ सचिन‎ दादा कल्याणशेट्टी, महापौर‎ विनायक‎ कोंड्याल,‎ स्वीकृत‎ नगरसेवक मनीष केत, माजी नगरसेवक जगदीश पाटील,‎ लालू‎ खंडेलवाल,‎ समर्थ‎ नरवडे, वसंत हेमगड्डी, फारुख‎ बागवान, सचिन जाधव,‎ माणिक‎ कांबळे तसेच ईच्छा‎ भगवंताची‎ परिवारातील पदाधिकारी व सदस्य‎ मोठ्या‎ संख्येने‎ उपस्थित‎ होते. राज्याचे‎ महसूल‎ मंत्री‎ चंद्रशेखर बावनकुळे‎ यांनी‎ विधिमंडळात बी-२‎ निर्बंध‎ हटविण्याची‎ अधिकृत‎ घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ साहेब‎ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री‎ जयकुमार भाऊ‎ गोरे यांच्या विशेष‎ सहकार्याने‎ हा‎ निर्णय शक्य झाला. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न‎ मार्गी लावण्यासाठी‎ आमदार देवेंद्र‎ दादा कोठे‎ यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या‎ निर्णयामुळे बी-२‎ निर्बंधाखालील‎ कामगार‎ चाळींमधील‎ सुमारे नऊ हजार कुटुंबांना घराचा‎ कायदेशीर‎ मालकी‎ हक्क‎ मिळण्याचा मार्ग‎ मोकळा झाला असून, खरेदी-विक्री, बँक कर्ज,‎ वारस‎ नोंद,‎ पुनर्विकास व बांधकाम परवानग्यांतील अडचणी‎ दूर‎ होणार‎ आहेत. यावेळी‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ म्हणाले, कामगारांच्या‎ हक्काच्या‎ घराचा‎ प्रश्न‎ अनेक वर्षे प्रलंबित होता.‎ आमदार‎ देवेंद्र दादा‎ कोठे यांनी‎ चिकाटी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि प्रभावी‎ पाठपुराव्याच्या‎ जोरावर‎ हा ऐतिहासिक‎ निर्णय घडवून‎ आणला.‎ बी-२‎ निर्बंध‎ हटविण्याचा निर्णय सोलापूरच्या अभिमानात मानाचा तुरा रोवणारा आहे. आता‎ सोलापूरचा‎ विकास थांबणार‎ नाही, कारण‎ विकासाची‎ धुरा‎ सक्षम‎ नेतृत्वाच्या‎ रूपाने आमदार देवेंद्र‎ दादा‎ कोठे यांनी हाती‎ घेतली‎ आहे. अखेर स्वर्गीय‎ विष्णुपंत तात्यासाहेब कोठे‎ यांचे‎ स्वप्न‎ आमदार‎ देवेंद्र‎ दादा‎ कोठे यांनी पूर्ण केला‎ असे‎ मनोगत यावेळी किसन‎ जाधव‎ यांनी व्यक्त केलं.‎ सत्काराला उत्तर देताना‎ आमदार‎ देवेंद्र‎ कोठे‎ म्हणाले,‎ बी-२चा‎ प्रश्न हा‎ हजारो कामगार कुटुंबांच्या‎ न्यायाचा आणि‎ हक्काचा विषय होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल‎ मंत्री‎ चंद्रशेखर बावनकुळे आणि‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांच्या‎ सहकार्यामुळे‎ हा ऐतिहासिक निर्णय‎ शक्य झाला.‎ सोलापूरच्या सर्वांगीण‎ विकासासाठी, रोजगारनिर्मिती,‎ आयटी पार्क,‎ उद्योगवाढ, पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी‎ माझा‎ पाठपुरावा यापुढेही अधिक जोमाने‎ सुरू‎ राहील. सोलापूरला‎ विकासाच्या‎ नव्या उंचीवर नेण्यासाठी‎ मी‎ सदैव कटिबद्ध आहे. यावेळी‎ उपस्थितांनी बी-२‎ निर्बंध‎ हटविण्याचा निर्णय हा‎ सोलापूरच्या कामगार वर्गासाठी ऐतिहासिक‎ ठरल्याची भावना व्यक्त करत‎ आमदार देवेंद्र दादा‎ कोठे‎ यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ शहराच्या विकासाला अधिक‎ वेग मिळेल, असा विश्वास‎ किसन जाधव‎ यांनी‎ व्यक्त केला.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages