सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 सोलापूर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय: आरोपी चिंता यांना अटकपूर्व जामीन मंजूर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका कथित फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले ए. वी. चिंता यांना सोलापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.
सत्र न्यायाधीश मनोज शिवप्रसाद शर्मा झालेल्या सुनावणीत  चिंता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (क्र. ५६०/२०२६) मंजूर केला.

काय आहे प्रकरण?
हा वाद एका ३५० सीसी क्लासिक बुलेट मोटरसायकलच्या (क्रमांक MH-02/ET-7958) खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार, जे स्वतः पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी असा आरोप केला होता की, २०२१ मध्ये झालेल्या या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली असून ए. वी. चिंता यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६३०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचे निरीक्षण आणि युक्तिवाद:
 चिंता यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की, सदर गुन्हा हा केवळ जुन्या आर्थिक आणि सिव्हिल (दिवाणी) स्वरूपाच्या वादातून राजकीय/वैयक्तिक द्वेषापोटी दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे स्वतः पोलीस विभागात कार्यरत असूनही त्यांनी २०२१ च्या व्यवहारावर तब्बल ३ वर्षांनंतर (ऑगस्ट २०२५ मध्ये) एफ.आय.आर. (FIR) दाखल केला. एवढा मोठा उशीर संशयास्पद असून, ही तक्रार केवळ त्रास देण्याच्या हेतूने केल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फै ॲड श्रीनीवास कटकुर यांनी बाजु मांडली.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर हे मान्य केले की, व्यवहार २०२१ चा असून मोटरसायकलचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे आहे, तसेच पैशांचे व्यवहार यु.पी.आय. (UPI) द्वारे झालेले असल्याने पोलिसांना चिंता यांच्या कस्टोडियल चौकशीची (कोठडीची) कोणतीही आवश्यकता नाही.

न्यायालयाचा आदेश:
सत्र न्यायालयाने  चिंता यांना १५,०००/- रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या जामीनदारावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासात सहकार्य म्हणून अर्जदाराने दर रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि पुराव्यांशी किंवा साक्षीदारांशी छेडछाड करू नये, अशा अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे  चिंता यांना मोठा दिलासा मिळाला  आहे. आरोपीतर्फै ॲड श्रीनीवास कटकुर व ॲड आकाश आयंची यानी काम पाहिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages