अन्नछत्र हे माझे श्रद्धेय- स्वप्नील जोशी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

अन्नछत्र हे माझे श्रद्धेय- स्वप्नील जोशी

 अन्नछत्र हे माझे श्रद्धेय- स्वप्नील जोशी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे श्री स्वामी रुपी वटवृक्षात रुपांतर होत असून, आम्हा भक्तांना लागणाऱ्या सोयी – सुविधा ह्या एकाच छताखाली दिल्या जात असून, अन्नछत्र हे माझे श्रद्धेय असल्याचे मनोगत मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वामी भक्त स्वप्नील जोशी मुंबई यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, रेखीव धातूशिल्प प्रतिमा देण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी न्यासचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोज निकम, सौरभ मोरे, बाळासाहेब कुलकर्णी, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, सर्फराज शेख, प्रवीण देशमुख, अतिश पवार, ज्ञानेश्वर भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, दत्ता मोरे, दत्ता माने, पिट्टू साठे, शुभम सावंत, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, किरण साठे, असद फुलारी, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, संतोष माने, महांतेश स्वामी, राहुल इंडे, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages