उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त सौ. माया झोळ यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त सौ. माया झोळ यांचा सत्कार

 उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त सौ. माया झोळ यांचा सत्कार




करमाळा (कटूसत्य वृत्त):- दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव तथा उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त सौ. माया रामदास झोळ यांचा करमाळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभास करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदूकाका सरडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे भोसले, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष काका सरडे, वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार, डीगा तात्या रासकर, पप्पू उकिरडे, युसुफ शेख, गव्हाणे साहेब, प्रा. रामदास झोळ, भीमराव झोळ, मनोज झोळ, बाळू शेख, अमोल भोईटे, सचिन भोईटे, सुभाष झोळ, अजित झोळ, योगेश झोळ, संकेत झोळ, आकाश झोळ, प्रफुल्ल झोळ, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळा रणदिवे, हमीद सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौ. मायाताई झोळ यांना उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व उद्योजकीय कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी प्रा. रामदास झोळ व उपस्थित मान्यवरांमध्ये शिक्षण, उद्योग, सामाजिक विकास आणि विविध समकालीन विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages