राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी आनंदाची बातमी असून, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजना २०२६-२७ अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात प्रस्ताव २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील यांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करताना प्रतिष्ठानने निश्चित केलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. संबंधित सूचना व मार्गदर्शक तत्त्वे स्वतंत्र पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यानुसारच प्रस्ताव तयार करणे बंधनकारक आहे.

प्रस्ताव हा विहित नमुन्यातच सादर करावा. तसेच प्रस्तावाच्या चार प्रती तयार करून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत. अपूर्ण माहिती, चुकीच्या स्वरूपातील प्रस्ताव किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर करण्यात आलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतीचे विशेष भान ठेवण्याचे आवाहन केले आहे. २१ ऑगस्ट २०२६ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नसल्याने संबंधित ग्रंथालयांनी वेळेत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध निधी योजनांमुळे सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथसंपदा वाढविणे, वाचन संस्कृतीला चालना देणे तसेच ग्रंथालयांच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळत असते. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र ग्रंथालयांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही  जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रमोद पाटील यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages