खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

 खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- आधुनिक काळातील नव नवे तंत्रज्ञानातून शेतीचा विकास करण्यासाठी निर्माण झालेल्या विविध मोबाईल अ‍ॅप्सची माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्याथींनींनी खुनेश्‍वर गावात जावून दिली. कृषीकन्या बनून विद्यार्थींनीनी शेतकर्‍यांना या आधुनिक मोबाईल अ‍ॅप्सचा कसा लाभ करून घेता येईल हेही समजावून सांगितले.
   प्रात्यक्षिक दाखवताना शेतकर्‍यांना समजेल अशा साध्या भाषेत आधुनिक अ‍ॅप्सची माहिती देवून शेतात या मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून शेतीचे व्यवस्थापन कसे करावे, हवामानाचा अंदाज कसा घ्यावा, बाजारभाव काय आहे, शेतातील फळ आणि पिकांना किड, बुरशी पासून कसे संरक्षण करावे, त्यांचे नियंत्रण कसे करावे, पाणी औषधे कसे दिले पाहिजे तसेच शासकीय योजनांची माहिती कशी घ्यावी याबाबत कृषीकन्या बनलेल्या विद्यार्थींनीनी शेतकर्‍यांना सविस्तरपणे माहिती दिली. त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हा उपक्रम लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे , रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. व्ही.टी. दावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनी कृषीकन्या अंबिका फताटे,प्राची आवताडे, सुषमा पवन गोल्ला,तृप्ती कदम, एैश्‍वर्या बंडगर,प्रणाली रूपनर यांनी यामध्ये सहभाग घेत शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages