शासकीय सेवेत माणसातच देव पाहिला; पदोन्नतीनिमित्त निरोप समारंभात किरण गायकवाड भावूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

शासकीय सेवेत माणसातच देव पाहिला; पदोन्नतीनिमित्त निरोप समारंभात किरण गायकवाड भावूक

 शासकीय सेवेत माणसातच देव पाहिला; पदोन्नतीनिमित्त निरोप समारंभात किरण गायकवाड भावूक

अहिल्यानगर येथे साखर सहसंचालकपदी पदोन्नती; सहकार विभागात निरोप व स्वागत समारंभ उत्साहात



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शासकीय सेवा करताना मी माणसातच देव पाहिला. माणसात देव पाहणाऱ्याला ठायीठायी देव दिसतो. कोणावरही अन्याय होणार नाही, ही भूमिका मी शेवटपर्यंत जपली. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची प्रतिमा उंचावण्यात कार्यालयातील सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. निवडणुका, अवैध सावकारीविरोधातील कारवाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली, असे भावनिक उद्गार जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी काढले.

अहिल्यानगर येथे साखर सहसंचालकपदी किरण गायकवाड यांची पदोन्नती, जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांची नाशिक येथे बदली तसेच सहायक निबंधक उमेश पवार यांची सोलापूर शहर उपनिबंधकपदी पदोन्नती झाल्याबद्दल सहकार विभागाच्या वतीने निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला कोषागर अधिकारी वैभव राऊत, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, धाराशिवचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किरण गायकवाड व त्यांच्या पत्नी आरती गायकवाड, कुंदन भोळे तसेच उमेश पवार व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांनी केले. कार्यक्रमास सहायक निबंधक दत्तात्रय भवर, वैशाली साळवे, विद्यानंद बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर देशमुख यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages