धनादेश न वटता परत आलेल्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता- ॲड. साजीद इनामदार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यातील फिर्यादी नागराज श्रीमंत पाटील यांनी दि. २१/१२/२०२३ यातील आरोपी नंदकुमार सिद्राम कळंत्रे यांचे विरूध्द परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ चे कलम १३८ प्रमाणे सोलापूर येथील न्यायालयात एस.टी.सी.नं.८८६०/२०२३ अन्वये धनादेश न वटता परत आल्याने फिर्याद दाखल केली होती.
सदर खटल्याची सुनावणी ही सोलापूर येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. विनायक एम रेडकर साहेब यांचे कोर्टामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये फिर्यादीच्या वतीने फिर्यादी तसेच इतर साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यावेळेस उलट तपासात आरोपीचे वकिल ॲड. साजीद एस इनामदार यांनी खटल्यातील महत्त्वाच्या बाबी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणल्या तसेच सदरच्या खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपींच्या विरुध्द साक्षीदारांनी दिलेली साक्ष ही विश्वासहार्य नसून साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आहेत, तसेच फिर्यादीच्या कोर्टातील जबाबात फिर्यादी व आरोपी यांच्यात ठरलेल्या बांधकाम व्यवहाराप्रमाणे आरोपीने चेकमध्ये नमूद रक्कम बांधकामासाठी वापरल्याचे मे. कोर्टासमोर निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपी फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे चेकमधील नमूद रक्कम कोणत्याही कायदेशीर व्यवहारापोटी देणे लागत नाही असा युक्तिवाद आरोपी याचे वकिल ॲड. साजीद एस. इनामदार यांनी केला, त्यामुळे सबळ पुराव्याअभावी आरोपी विरूध्द प्रथम दर्शनी केस शाबीत न झाल्यामुळे आरोपी नंदकुमार सिद्राम कळंत्रे यास मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. विनायक एम रेडकर साहेब यांनी दि.१५/०७/२०२६ च्या आदेशान्वये निर्दोष मुक्त केले. सदर खटल्यामध्ये आरोपी तर्फे अॅड. साजीद सय्यद इक्बाल इनामदार यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment