श्री शिवशंकर वीज कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी सत्यशील गायकवाड यांची बिनविरोध निवड!
अकलूज (कटूसत्य वृत्त):-.अकलूज येथील श्री शिवशंकर वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित,अकलूजच्या संचालकपदी सत्यशील मोहनदास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.संस्थेचे संचालक गोरख दगडू कर्चे हे महावितरण सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी आपल्या संचालक पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या संचालक पदासाठी सहकार क्षेत्रातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.मा. सहकार उपनिबंधक,अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी म्हणून ए.जी.जाधव यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.
या प्रक्रियेत खुल्या गट प्रवर्गातून केवळ सत्यशील मोहनदास गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची या रिक्त जागी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले.या निवडीप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन राजाराम घुगे,व्हा.चेअरमन युवराज गौड,सचिव संतोष चव्हाण,संचालक,कृष्णदेव काळे, सरगम साठे,प्रकाश हुंडे,देविदास लोंढे,गणेश शिंदे,राहुल शिंदे, परमेश्वर व्यवहारे तसेच इंटक संघटना सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आनंदराव पाखरे व उपकार्याध्यक्ष नागनाथ पांढरे, पतसंस्था कर्मचारी माने,राऊत, जमदाडे उपस्थित होते.
"सत्यशील गायकवाड यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल इंटक संघटना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच वीज कामगार क्षेत्रातून आणि सहकार वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे".

No comments:
Post a Comment