विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा पुढाकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 18, 2026

विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा पुढाकार

 विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा पुढाकार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक बांधिलकी जपत श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने गोदुताई परूळेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुली), विडी घरकुल अ, कुंभारी येथे विद्यार्थिनींसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरओ मशीन भेट देण्यात आले.
           कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून समाजसेविका विमलादेवी बिहाणी, लीला नावंदर, पुष्पा राठी तसेच उद्योजक सुनिल बलदवा, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर चितली आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आरओ मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
           या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थिनींना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी व्यक्त केले.
         सूत्रसंचालन राजश्री कोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनुश्री कासट, अक्षता कासट, शुभांगी लचके, संतोष अलकुंटे, प्रज्ञा गायकवाड, नागनाथ गवंडी, शोभा पांचाळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages