ऑक्टोबर हिट'मध्येच तापणार गावगाडा; सोलापूरातील ७०२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 18, 2026

ऑक्टोबर हिट'मध्येच तापणार गावगाडा; सोलापूरातील ७०२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका

 ऑक्टोबर हिट'मध्येच तापणार गावगाडा; सोलापूरातील ७०२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि येत्या काही दिवसांमध्ये मुदत संपत असलेल्या अशा एकूण ७०२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ग्रामपंचायतींसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे.

या ग्रामपंचंयात निवडणुकांसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीची मतदार यादी वापरली जाणार आहे. २४ जुलैला प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आयोगाने दोन दिवसांपूर्वी प्रभागनिहाय मतदार यादी तया करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहिर केला आहे.

महाआयटीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे संगणकीय पद्धतीने या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तालुकानिहाय पडताळणी पूर्ण केली आहे. मूळ विधानसभा मतदार यादीतील मतदारांची संख्या आणि प्रभागनिहाय विभागणी समान राहील तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदार समाविष्ट होणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सरपंचपद व सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया यापूर्वीच झालेली आहे.

सोलापूरसह राज्यभरात दसरा- दिवाळी दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

दोन वर्षांपूर्वी दसरा-दिवाळी दरम्यान विधानसभा निवडणूकांची राज्यभरात लगबग होती. तर, यंदाच्या दसरा-दिवाळी दरम्यान राज्यातील सुमारे २७ हजार पैकी तब्बल १५,११५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये सोलापूरातील एकूण १०२७ पैकी ७०२ निवडणूका आहेत. जिल्ह्यातील निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणूका या टप्यात होतील. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तापलेले राजकारण राजकारण आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा रंगणार आहे.

मतदार यादीचा कार्यक्रम

२४ जुलै: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.
२४ ते २९ जुलै : मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदवण्याचा कालावधी
४ ऑगस्ट : अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी
तालुकानिहाय निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती….

बार्शी : १००
माढा : ८५
पंढरपूर : ७८
अक्कलकोट : ७७
मोहोळ : ७६
सांगोला : ६७
माळशिरस : ५७
करमाळा : ५४
दक्षिण सोलापूर : ५४
मंगळवेढा : ३०
उत्तर सोलापूर : २४
एकूण : ७०२

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages