छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्य पदी नितीन मोटे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्य पदी नितीन मोटे

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्य पदी नितीन मोटे   


      

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ. नितीन मोटे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी डॉ.मोटे हे पुण्यातील वडगाव येथील शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून काम केले असून एनएसएस कार्यक्रमाधिकारी आणि विभाग समन्वयक म्हणूनही त्यांनी सेवा बजावले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठशी सलग्नित  विविध महाविद्यालयात वक्ता म्हणून व्याख्याने दिली आहेत. नुकतीच त्यांची सोलापुरातील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्राचार्य पदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस महेश माने, छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, माजी प्राचार्य अरुण मित्रगोत्री सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, त्यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages