नेताजी प्रशालेत पालक शिक्षक सभा उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 25, 2026

नेताजी प्रशालेत पालक शिक्षक सभा उत्साहात

 नेताजी प्रशालेत पालक शिक्षक सभा उत्साहात




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते. व्यासपीठावर मावळते पालक-शिक्षक संघाचे सहसचिव वैशाली अभंगे, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ शिक्षक संगप्पा दसगोंडे, गणपती पाटील, सिद्धाराम कुंभार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ माळगोंडे, राजेंद्र मुलगे, शिवानंद पुजारी, विजयालक्ष्मी माळवदकर, जयश्री बिराजदार आदी शिक्षकांनी शालेय शिस्त, बदलता शैक्षणिक अभ्यासक्रम, शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, शालेय उपक्रमांचे महत्त्व, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक गुणवत्ता या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पालक-शिक्षक संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, उपाध्यक्षपदी  साधना तावसकर, सचिवपदी गणपती पाटील आणि सहसचिवपदी प्रकाश तुम्मा आदीसह वर्ग निहाय पालक सदस्यांची निवड करण्यात आली.
पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी प्रास्ताविकेत विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची माहिती सांगून शाळेत राबविण्यात येणाऱ्या स्काऊट-गाईड उपक्रम, शालेय गणवेशाचे महत्त्व, एकल पालक योजनेचा लाभ आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व वाचनाची आवड आदी उपक्रमांची माहिती सांगितले. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, आज विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला महत्त्व असल्याने पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे वेळोवेळी लक्ष द्यावे.सध्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटल पध्दतीने शिक्षक अध्यापन करित असल्याने विद्यार्थ्यांचे गुणवत्ता नक्कीच वाढणार असून पालकांनी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.शेवटी पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.पालकांनी शाळेतील विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर प्रकाश कोरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages