संस्थेचा लौकिक वाढविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान : अजिंक्यराणा पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

संस्थेचा लौकिक वाढविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान : अजिंक्यराणा पाटील

 संस्थेचा लौकिक वाढविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान : अजिंक्यराणा पाटील




मोहोळ (कटूसत्य वृत्त): श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथील सहशिक्षक बब्रुवान बोडके हे २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अजिंक्यराणा पाटील म्हणाले, "कोणतीही संस्था तिच्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक काम, निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर मोठी होत असते. शाळेतील शिस्त, विद्यार्थ्यांची घेतली जाणारी काळजी, शिक्षकांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या बळावर पालकांचा विश्वास संपादन करण्यात संस्थेला यश आले आहे. शिक्षकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कार्यामुळेच या विद्यालयाने मोहोळ तालुक्यातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शाळा असा लौकिक प्राप्त केला आहे. संस्थेचा नावलौकिक वाढविण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे."
यावेळी कृषिभूषण दादा बोडके, श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी प्राचार्य महादेव चोपडे, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे, उपमुख्याध्यापक माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, मोहोळ तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण, युवराज गुंड, संभाजी बोडके, चंद्रकांत यावलकर, सिताराम बोराडे, अभिमन्यू शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सतीश सुर्वे, अस्मिता बोडके, कृषिभूषण दादा बोडके, माजी प्राचार्य रणजीत थिटे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले तसेच वर्षा बोडके यांनी मनोगते व्यक्त करताना बब्रुवान बोडके यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या शांत, संयमी व कर्तव्यदक्ष स्वभावाचा उल्लेख करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच बोडके यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोडके यांच्या २७ वर्षांच्या समर्पित सेवेमुळे संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले, तर उपमुख्याध्यापक माधव खरात यांनी आभार प्रदर्शन केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages