छत्रपती शिवाजी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

छत्रपती शिवाजी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 छत्रपती शिवाजी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित, छत्रपती शिवाजी प्रशालेत 21जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
      यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.सुजाता जुगदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.महेश माने यांनी भूषविले. प्राध्यापक व योगशिक्षक श्री.शिवराज पाटील  हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
      प्रारंभी प्रशालेतील  विद्यार्थ्यांनी कु.संजीवनी पाटील हिने श्लोक सादर केले. प्रशालेतील योग शिक्षिका सौ.नेहा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी कु.काया काळे आणि त्या टीम मधील सदस्य कु.श्रावणी पाटील,कु.नंदिनी बंडगर, कु.जेनिफर बंद्दीपुडे,कु.कीर्ती कोले,कु.स्वरा कारंडे, कु.सृष्टी कारंडे, कु.रेणुका चव्हाण, कु.अक्षता गंगोंडा, कु.रितिका कोळी, कु.सृष्टी हडपद कु.प्रज्ञा जमादार,कु.अक्षरा गदडे, कु.प्रज्ञा जमादार, कु.पवित्रा नागलगाव, कु.कमळाबाई पडसलगी, कु.प्रीती खांडेकर, चि.भाग्योदय नागलगाव, चि.सदाशिव बिराजदार यांनी योगा थीमवर योगासनाचे अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक सादर केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी  योगासनाचे विविध प्रकाराचे सादरीकरण  केले.
       प्रमुख पाहुणे प्राध्यापक  शिवराज पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शारीरिक कष्टाची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी गोष्टी रुपातून विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व स्पष्ट केले.
       अध्यक्षीय भाषणात संस्थेचे जनरल सेक्रेटरी महेश माने म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यानी सदृढ शरीरासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. योगामुळे आपण शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या सक्षम होतो.
         या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी महेश माने, शालेय समिती चेअरमन(प्राथ.विभाग)विनायक राव पाटील, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, उपमुख्याध्यापक श्रीपादराव जगदाळे,पर्यवेक्षक सुरेश जगताप व किरण देशमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रियांका पवार, प्रसिद्धीप्रमुख निलेश गळवे, योगशिक्षिका नेहा स्वामी तसेच शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कु.लक्ष्मी गायकवाड यांनी केले तर आभार प्राध्यापिका सुनंदा बिराजदार यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages