ग्रामीण भागात ८ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची खा. प्रणिती शिंदे यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

ग्रामीण भागात ८ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची खा. प्रणिती शिंदे यांची मागणी

 ग्रामीण भागात ८ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची खा. प्रणिती शिंदे यांची मागणी

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देत ग्रामीण भागात ६ तासांऐवजी ८ तास थ्री फेज वीजपुरवठा कायम सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या एम.एस.ई.बी.कडून ६ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी व पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या दुधाची धार काढण्यासाठी मशीन चालवणे, पाण्यासाठी मोटार सुरू करणे तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबाकुट्टी मशीन चालविणे यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ६ तासांऐवजी ८ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आदेश देण्यात यावेत, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages