अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी जमीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 18, 2026

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी जमीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी जमीन खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमीहीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पात्र भूमीहीन व्यक्तींना 04 एकर जिरायती जमीन प्रति एकरी रुपये 5 लाख किंवा 02 एकर बागायती जमीन प्रति एकरी रुपये 8 लाख या कमाल मर्यादेत खरेदी करून देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीतील दारिद्रय रेषेखालील भूमीहीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 60 वर्षे असावे. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या गावातील पात्र लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून, लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या गावातील पात्र व्यक्तींना जिल्हा समितीच्या मान्यतेने लाभ दिला जाईल.
योजनेत परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्त लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत गायरान किंवा सिलिंग जमीन वाटप झालेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
योजनेअंतर्गत मिळालेली जमीन लाभार्थ्याने स्वतः कसणे बंधनकारक असून ती जमीन अन्य व्यक्ती किंवा संस्थेस विक्री, हस्तांतरण किंवा भाडेपट्ट्याने देता येणार नाही.
तसेच, जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. विक्रीसाठी प्रस्तावित जमीन विना बोजाची, वादमुक्त, चांगल्या प्रतीची व सलग स्वरूपातील असावी. खडकाळ, क्षारयुक्त, डोंगर उतारावरील किंवा नदीपात्राजवळील जमीन स्वीकारली जाणार नाही.
सदर योजनेचा लाभ अधिकाधिक मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी पात्र लाभार्थी तसेच जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages