सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर येथे अधिक्षक पदांची भरती
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर येथे अशासकीय सहाय्यक वसतिगृह अधिक्षक पदाची भरती करण्यात येणार आहे.
सहाय्यक वसतिगृह अधिक्षकाचे एक पद भरावयाचे असून निवड झालेल्या उमेदवारास प्रतिमहा रुपये २४ हजार ८७५ इतके मानधन देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवार हा सैन्यदलातील किमान हवलदार पदावरून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी व इंग्रजी टंकलेखनासह संगणक हाताळणीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी आपले अर्ज, सैनिक सेवेची कागदपत्रे तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक २९ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत.
प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने दिनांक २ जून २०२६ रोजी (मंगळवार) सकाळी १०.०० वाजता मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
सोलापूर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मिलिंद तुंगार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment