डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेतर्फे मिरवणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेतर्फे मिरवणूक

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापालिकेतर्फे मिरवणूक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्ताने सोलापूर महानगरपालिकेतर्फे सालाबादप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक मध्ये शामिल होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेचे वाहनाचे पूजन महापौर श्री विनायक कोंड्याल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, पृथ्वीराज कोंड्यात, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखापरीक्षक रत्नराज जवळेकर नगर अभियंता सारिका आकुलवार, महेश देवकर,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये राजाभाऊ सरवदे, आनंद चंदनशिवे,राजाभाऊ इंगळे,मिलिंद प्रेक्षाळे, सुबोध वाघमोडे,लौकिक इंगळे, विनीत गायकवाड सुशील सरवदे,दशरथ कसबे, पिंटू डावरे, विकी शेंडगे,राहुल शंके, प्रवीण निकाळजे, राजरत्न फडतरे, शिवम सोनकांबळे,विनोद वाघमारे, बबन शिंदे तसेच ,सुग्रीव जेटीथोर, आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages