जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्मृतिवन वनविहार येथे स्वच्छता व वृक्षारोपण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक वसुंधरा दिन निमित्त स्मृतिवन वनविहार येथे स्वच्छता व वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सोलापूर महानगरपालिका, स्मृति उद्यान, इको फ्रेंडली क्लब, इको नेचर क्लब व वर्ल्ड वाइल्डलाईफ कंझर्वेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमास पर्यावरण संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या युवा उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रमुख उपस्थिती व कृतिशील सहभाग नोंदवला. याशिवाय सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री. लक्ष्मण आवारे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी शुभांगी जावळे, सचिन दोशी, श्री. कांबळे, संध्याराणी बंडगर, तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक कार्तिक पवार व राजकुमार उबाळे आदी.उपस्थित होते.
यावेळी स्मृतिवन परिसर हा उत्तम पर्यटन व जैवविविधतेचे केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. परिसराचे संवर्धन कसे करता येईल यावर विचारमंथन झाले असून, भविष्यात हे ठिकाण एक आदर्श स्मृति उद्यान म्हणून विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी महेश देवकर, विविध संस्थांचे पर्यावरणप्रेमी, इको फ्रेंडली क्लबचे परशुराम कोकणे, डब्ल्यूसीएफचे संतोष धाकपाडे, अजित चौहाण तसेच इको नेचर क्लबचे प्रवर्तक व वसुंधरा अभियानाचे पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, मेघा क्षीरसागर, डॉ. सौ. बोराडे, सौ. पाटील ताई, सचिन कांबळे आदींच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला व “वसुंधरा रक्षणार्थ, स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर – हरित सोलापूर” अशा घोषणाबाजीद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रमुख उपस्थिती व पर्यावरण पूरक संस्था व प्रमुख यांचा सामाजिक वनीकरण यांच्याकडून सन्मान हे करण्यात आला

No comments:
Post a Comment