मिरवणुकीसाठी मध्यरात्रीपर्यंत वेळ वाढवण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ मे रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीसाठी रात्री १२.०० वाजेपर्यंत वेळ मिळावा, या मागणीसाठी आज ठोस पाऊल उचलण्यात आले.
पोलीस प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मिरवणुकीची वेळ वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट झाल्याने, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मा. दिनेश पारगे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे १४ मे रोजी होणाऱ्या मिरवणुकीसाठी मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक राम भैय्या जाधव यांच्यासह संदीप आबा चेळेकर, सुदीप पिंपरे, युवराज पाटील, राहुल जाधव, सागर गायकवाड, शुभम वाघमोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, मिरवणूक एकजुटीने, शिस्तीत आणि सर्व नियमांचे पालन करून पार पाडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान हा स्वाभिमानाचा विषय असून, मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment