ब्रम्हदेव बरकडे–माने एडिशनल डीपीचे भूमिपूजन संपन्न
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- बचेरी येथे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत मंजूर करण्यात आलेल्या ब्रम्हदेव बरकडे–माने एडिशनल डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइंट) कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. आमदार राम सातपुते यांच्या पुढाकारातून हे काम मंजूर झाले असून, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत दादा जाधव, पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, माजी सरपंच नितीन मोहिते (पिलीव), बचेरीचे माजी सरपंच सर्जेराव कोकरे तसेच प्रा. सदाशिव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्रम्हदेव बरकडे, संभाजी माने, खंडू माने व पांडुरंग बरकडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. प्रारंभी सुवासिनींच्या हस्ते डीपी साहित्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आमदार राम सातपुते यांनी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. डीपी बसविण्यात येत असल्यामुळे बरकडे, माने, खरात, कोळेकर, ढवळे, थिटे, कोकरे आदी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बचेरी परिसरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सातपुते यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचे आश्वासन चंद्रकांत जाधव व शिवराज पुकळे यांनी दिले. तसेच कामांच्या पाठपुराव्यासाठी प्रा. सदाशिव शिंदे, भाजपा अध्यक्ष पै. राम गोरड तसेच कार्यकर्ते जयवंत भिसे, गणेश पाटील, गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
बरकडे वस्तीला डीपी मिळवून देण्यासाठी जयराम बरकडे व सचिन खरात यांनी विशेष प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या भूमिपूजन कार्यक्रमास ब्रम्हदेव बरकडे, संभाजी माने, पांडुरंग बरकडे, लहू माने, सदाशिव माने, खंडू माने, जगदीश गोडसे, अमोल थिटे, सोमनाथ माने, आबा बरकडे, बिरूदेव ढवळे यांच्यासह शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment