सोलापूरात पाणी पेटलं; पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2026

सोलापूरात पाणी पेटलं; पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा

 सोलापूरात पाणी पेटलं; पाणीपुरवठा योजनेवरून महापालिकेत विरोधकांचा राडा


 नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे निलंबित





– भ्रष्टाचारासाठी आठशे कोटीची योजना 1400 कोटी वर नेली
– पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात घोषणाबाजी
– सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची दिशाभूल करून प्रस्तावास मान्यता घेतली – विरोधकांचा आरोप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये अक्षरशः राडा झाला. कर वाढीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होताच महापौर विनायक कोंड्याल यांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे निलंबित करण्याचे आदेश दिले.

गोंधळातच पाणीपुरवठा योजनेला एकमताने मान्यता देण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 20 एप्रिल रोजी महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये घेण्यात आली या सभेमध्ये तीस वर्षाचा विचार करून साकारण्यात येणारी 1400 कोटीची अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजनेचे सादरीकरण यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष आमनेसामने येत अभूतपूर्व गोंधळ उडाला. नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने कर वाढ लादण्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृह दणाणून सोडले. शिवसेना गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

परिस्थिती हाताबाहेर जाताच महापौर विनायक कोंड्याल यांनी कठोर पाऊल उचलत अमोल शिंदे चेतन नरोटे या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित केले. त्यांच्या माईकही बंद करण्यात आले. तसेच, सभागृह सोडले नाही तर पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्याचा इशाराही देण्यात आला.

दरम्यान, गदारोळाच्या वातावरणातच महापौरांनी अनेक विषयांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही एकमताने हिरवा कंदील मिळाला. सभागृहाबाहेर निलंबित नगरसेवकांनी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करत विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या एकंदरीत आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृह रणांगण बनले होते. सोलापूरच्या पाणीप्रश्नावरून राजकारण तापल्याचे पहावयास मिळाले.

विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी समाजशास्त्र पाळले नाही,सभागृहात शिस्तभंग, अर्वाच्य भाषा वापरली आणि सूचनांकडे दुर्लक्ष केले उपस्थित नगरसेवकांची दिशाभूल करत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मे मध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांना बसता येणार नाही, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. पाणीपुरवठ्याची योजना करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे.हे कर्ज घेण्यासाठी वर्ल्ड बँकेने महापालिकेत कर प्रणालीमध्ये बदल करण्याच्या सूचना केले आहेत.त्यानुसार सभागृहांमध्ये करवाढीचा प्रस्ताव छुप्या पद्धतीने सादर करण्यात आला होता. त्याला विरोध केला असता महापौराने आमचे निलंबित केले. कर प्रणाली बदलल्यामुळे रेडी रेकनर दरानुसार टॅक्सचे आकारणी गावठाण भागांमध्ये होणारा होणार आहे.

चौकट-

करवाढ करणार नाही - महापौर कोंड्याल

पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा असल्याने याच महिन्याचा सभेत अजेंडावर आहेत. पण, सभेच्यापूर्वी पार्टी मिटिंगमध्ये आम्ही दोन्ही आमदारांसोबत चर्चा करू. तसेच शहरावर कोणतेही कर वाढवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देखील कोंड्याल यांनी दिले. त्यामुळे, 20 तारखेच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर प्रचंड गोंधळात ही योजना मंजूर करण्यात आली असून विरोधकांनी मात्र यास जोरदार विरोध केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages