शेतकऱ्यांचा रोष उफाळला; उजनीतील बंधारा कोरडा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील नळी, माचनूर,अरळी भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट कोसळले आहे.
विशेष म्हणजे उजनी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हजारो एकरांवरील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून, हा प्रश्न आता केवळ कृषीपुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पातळीवरही धगधगू लागला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने वाढलेल्या उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच शेतकऱ्यांना शेतीला दिल्या जाणारे पाण्याचे संकट आले आहे.
उजनी धरणात पाणी असून देखील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर ,मंगळवेढा,मोहोळ,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील बंधाऱ्याकडे पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे "पाणी आहे, पण आमच्यासाठी नाही" अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. पाण्याचे नियोजन, वितरण आणि स्थानिक गरजांचा विचार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठ भागांतील अनेक गावात उपसा जलसिंचन योजना अवलंबून आहेत. मात्र भीमा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने या योजना काहीशा ठप्प झाल्या आहेत. परिणामी, ऊस, गहू, मका यांसारखी नगदी व अन्नधान्य पिके वाचवणे कठीण झाले आहे. हजारो शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची वेळ आली असून ग्रामीण अर्थचक्र विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भीमा नदी काठावरील गावात जनावरांना तसेच पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतीतील हिरवीगार पिके देखील पाण्यावर पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत तरी उजनी धरणातून नदीकाठ भागात पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे भीमा नदी काठावरील अनेक गावे तहानलेले आहेत नदीची पाणी पातळी तळाला गेली असून कृषी पंप नदीच्या मध्यावर असूनही नदी कोरडी ठणठणीत पडल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीच्या खोलगट भागात डोह यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करीत आहेत.
भीमा नदीचे पात्र कोरडी पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबर जनावरांना तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नदीपत्रातील तळ उघडा पडला आहे मागील काय महिन्यापूर्वी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरता राजकीय वापर प्रशासना कडून विचार केला गेला परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये भीमा नदी काठ भागातील परिसरात पाणी न सोडल्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन पावसाळ्यामध्ये भीमा नदीला पूर येत असतो परंतु योग्य नियोजन न केल्यामुळे नदीपात्रातील अनेक टीएमसी पाण्याचा विसर्ग वाया जात असून त्याची योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्यासाठी संकट ओढावले जाते त्यामुळे पिकांना जीवदान देणे महत्त्वाचे असताना प्रशासन याच्याकडे डोळे झाक करीत आहे.
हक्काचे पाणी व पाणी टंचाई पासून मुक्तता हवी असेल तर बंधारासाठी नेक गावांमध्ये जन्माचा रेटा हवा आहे अशा प्रकारच्या बंधार्यांना जमिनीही लागणार नाही धरणांतर्गत कामे होणार असल्याने त्यामुळे कोणीही विस्थापित होण्याची शक्यता नाही बंधारे केल्याचे फायदे मात्र आणि का आहेत परंतु पावसाळा संपला की अवघ्या चार महिन्यातच नदीचे पात्र कोरडे होते ठीक ठिकाणी बंधारे असतील तर सहा महिन्यापर्यंत पाणी ठोकवले जाऊ शकते व शेतीना पाणी व जनावराला पाणी मुबलक प्रमाणात मिळून शेतकरी हा सुखावला जाईल असे नियोजन प्रशासनाने करावे असे जनतेतून मागणी होत आहे. " नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्याला संकटास सामोरे जावे लागत आहे.

No comments:
Post a Comment