शासकीय योजनेतील शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2026

शासकीय योजनेतील शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच

 शासकीय योजनेतील शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच 

मंगळवेढ्यात दोघांवर गुन्हा




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी 16 हजार रुपये मागणी करून सहा हजार रुपये लाच घेऊन, उर्वरित दहा हजार रुपये रकमेसाठी तडतोज करून पाच हजार रुपये लाचेची मागणी करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील खाजगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाने मंगळवेढ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

या प्रकरणाची लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र हिम्मत लांभाते यांनी दिली. पोलीस सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सावळाराम विष्णू यादव यांची आई मंगल विष्णू यादव घरात पाय घसरून पडल्यामुळे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळवेढा मल्टीपेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

24 मार्च 2026 रोजी दुपारी तीन वाजून 58 मिनिट ते 4 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान येथील डॉ. अरुणकुमार महिंद्रकर व आरोग्य मित्र सोमनाथ इंगळे यांनी सदर शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करून देण्यासाठी 16 हजार रुपयेची मागणी केली त्यापैकी सहा हजार रुपये अगोदर घेतले होते.

उर्वरित दहा हजार रुपये रकमेमध्ये तडजोड करून त्यातील 5 हजार रुपयांची लाच मागणी करून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील दोघा विरोधात लाच लुचपत विभागाने दोन पंचांच्या समक्ष पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवेढा पोलीस स्टेशनला 1988 चे कलम 7,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले हे करीत असून, मंगळवेढा तालुक्यात खाजगी रुग्णालयाकडून सध्या विविध शस्त्रक्रियेच्या नावाखाली उपचारादरम्यान शासकीय उपचारासाठी आर्थिक मागणी केली जात असल्याची तक्रार यापूर्वी मनसेच्या एका पदाधिकाऱ्यांनी केली होती.

परंतु आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात अगोदरच ओले केले असल्यामुळे त्यांनी या तक्रारीकडे सोयीस्करच्या दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी रुग्णांच्या नातेवाईकाला तक्रारीसाठी लाचलुचपत पथकाचा आधार घ्यावा लागला. हा प्रकार केवळ आरोग्य खात्यापुरता मर्यादित नसून अन्य खात्याशी निगडित आहे अशा परिस्थितीत आज लाचलुचपत विभागाचे अधिकारी मंगळवेढा ठाण मांडल्यामुळे इतर विभागाचे अधिकारी देखील सतर्क होते व सातत्याने एकमेकांना विचार करत होते कुठे काय झाले आहे का? त्याची मात्र विचारणा करीत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षा या अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची अधिक भीती असल्याचे यातून स्पष्ट झाले. तर शासन ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णावर मोफत उपचारासाठी विविध योजना राबवत असताना वैद्यकीय क्षेत्रात मात्र रुग्णाला वेळीच उपचार करा अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होतील अशा भिती टाखवून रुग्ण व नातेवाईकांना छळणाऱ्या डॉक्टराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages