महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवर परिसीमनची अट- खा. प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवर परिसीमनची अट- खा. प्रणिती शिंदे

 महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवर परिसीमनची अट- खा. प्रणिती शिंदे




लखनऊ (कटूसत्य वृत्त):- उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर व नीयतवर तीव्र टीका केली. महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हटले की, प्रचंड बहुमत असूनही ‘रणनीतीचे धुरंधर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी-शहा यांची रणनीती अपयशी ठरणे ही गंभीर बाब असून लाजिरवाणी आहे.
यावेळी त्यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की, ही रणनीती खरंच अपयशी ठरली की ती जाणीवपूर्वक अपयशी केली गेली? सरकारला प्रत्यक्षात महिला आरक्षण लागू करण्याची इच्छा नसल्याची शंका या घडामोडींमुळे अधिक बळावते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, संबंधित विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून महिला आरक्षणाच्या आडून परिसीमन (डिलिमिटेशन) लागू करण्याचा एक पूर्वनियोजित प्रयत्न होता. विरोधकांनी हा डाव वेळेत ओळखून ठाम भूमिका घेत विधेयक फेटाळले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages