सिईओ जैन यांनी घेतला माळशिरस पंचायत समितीचा आढावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज माळशिरस पंचायत समितीचा ध्वजांकित योजनांचा आढावा घेतला. या प्रसंगी पंचायत समिती येथे जिल्हा नियोजन समिती मधून बसविणेत येत असलेले सोलार प्रकल्पाची पाहणी केली. माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच जलजीवन मिशन च्या पाण्याच्या टाकीची पाहणी करून योजना पुर्ण करणेचे सुचना दिल्या. तसेच तिरवंडी येथील प्राथमिक शाळेची पाहणी केली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर , माळशिरस गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment