शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे धरणे अंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे धरणे अंदोलन

 शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे धरणे अंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य सरचिटणीस  रमेश चौगुले सर  यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी प्राथमिक व माध्यमिक  शाळेतील शिक्षक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुनम गेट येथे धरणे अंदोलन  करण्यात आले .                                      
    खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे समयोजन तात्काळ करावे,दुरुस्तीसाठी पाठवलेले सेवकसंच तातडीने दुरुस्त  करणे,प्रलंबित सेवकसंच जनरेट करणे,पटपडताळणी परीक्षेच्या कालावधीत करु नये,वेतन दरमहा एक तारखेला अदा करा,बीएलओ च्या कामातुन शिक्षकांची मुक्तता करणे,थकीत वेतन देयकाचा निपटारा करा या मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील पुनम गेट येथे धरणे अंदोलन करण्यात आहे.या मागणीचे निवेदन सामान्य प्रशासन विभागातील प्रशासनाधिकारी स्मिता पाटील  प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अर्जुन वाघमारे, यांना देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस गोपी राठोड, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष वल्लभ चौगुले, माध्यमिक शहराध्यक्ष बिभीषण  शिरसाठ, प्राथमिकचे शहराध्यक्ष सोमनाथ गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष ज्ञानेश्वरी संगीत राव, डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश  महासचिव सुनिल चव्हाण,युवक शिक्षक संघटनेचे आप्पाराव इटेकर,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे अ.गफुर अरब,शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे प्रसाद मसरे,अंबादास चव्हाण शुभांगी निंबाळकर,संगीता भोसले,मुरलीधर कडलासकर,नारायण पवार,बरगली लांडगे,काशिनाथ  बडुरे,उल्हास बिराजदार,बसवेश्वर जुंदळे, आदी उपस्थित होते.

चौकट-
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,युवक शिक्षक कर्मचारी संघटना,शिवछत्रपती शिक्षक संघटना,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना,राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ आदी संघटनांनी या अंदोलनाला पाठींबा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages