हद्दवाढ व गुंठेवारी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

हद्दवाढ व गुंठेवारी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 हद्दवाढ व गुंठेवारी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांच्या मालमत्ता नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोजित विशेष शिबीर बुधवारी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, निलम नगर, एमआयडीसी येथे उत्साहात पार पडले. हद्दवाढ, गुंठेवारी मोजणी तसेच नोटरीद्वारे झालेल्या व्यवहारांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी या शिबिराला सुमारे २००० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात नागरिकांनी नोटरी कागदपत्रे, टॅक्स पावत्या, प्रॉपर्टी कार्ड, ७/१२ उतारे, खरेदीखत आणि नकाशे सादर करून आपल्या मालमत्तेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच RTSR अर्जांमुळे नोंदणी प्रक्रियेला गती मिळाली. या उपक्रमामुळे स्वतंत्र सातबारा उतारा मिळणे, बांधकाम परवानगी सुलभ होणे आणि बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंडयाल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी महापौरांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना अशा शिबिरांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सुटणार आहे. नागरिकांच्या विश्वासाला न्याय देत त्यांच्या स्वप्नातील घराला कायदेशीर आधार देणार असल्याचे सांगितले. नगरसेवक सिद्धेश्वर कमटम व नगरसेविका सौ सारिका सिद्धाराम खजूरगी यांनी शिबिराचे सुयोग्य नियोजन केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. नियमित गुंठेवारीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे महापौरांनी समाधानही यावेळी व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages