झपुर्झा गॅलरीत बुधवारपासून ‘शुभकामना’ पेन्सिल आर्ट चित्रांचे प्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

झपुर्झा गॅलरीत बुधवारपासून ‘शुभकामना’ पेन्सिल आर्ट चित्रांचे प्रदर्शन

 झपुर्झा गॅलरीत बुधवारपासून ‘शुभकामना’ पेन्सिल आर्ट चित्रांचे प्रदर्शन




 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे वास्तव्यास असलेले चित्रकार महेश सदाफुले यांच्या ‘शुभकामना’ या पेन्सिल आर्ट चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डफरीन चौकातील पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या झपुर्झा आर्ट गॅलरीत बुधवार दि. १५ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, यामध्ये ४५ कलाकृतींचा समावेश आहे, अशी माहिती संतोष धाटेगाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
           या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, माजी प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी
हास्यराम्राट प्रा. दीपक देशपांडे , राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे अध्यक्ष शेरशाह डोंगरी तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्राचार्य गोपाळराव डोंगे आणि प्रा. धनंजय टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या गॅलरीतील हे पाचवे चित्रप्रदर्शन असून ‘शुभकामना’ असे या प्रदर्शनाचे शीर्षक आहे. गुरुवार दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता चित्रकार नितीन खिलारे यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचे विशेष सहकार्य लाभत आहे.
        या प्रदर्शनास कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकृती पाहायला यावे , असे आवाहन चित्रकार महेश सदाफुले व पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी केले आहे.
        या पत्रकार परिषदेस शेरशाह डोंगरी, शांतप्पा काळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages