अरण येथे संत सावता महाराजांच्या चंदनउटी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

अरण येथे संत सावता महाराजांच्या चंदनउटी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम

 अरण येथे संत सावता महाराजांच्या चंदनउटी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील अरण येथे श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने संत सावता महाराजांच्या चंदनउटी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती आवाहन ट्रस्टचे सचिव ॲड. विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
            पंढरपूरच्या पांडुरंगाला ग्रीष्म ऋतूमध्ये चंदनउटी करण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर पांडुरंगाचे अखंड भक्त असलेल्या संत शिरोमणी संत सावता महाराज यांचीही चंदनउटी व्हावी या भावनेतून सुमारे २०० वर्षांपूर्वी सुरू झालेली अरण येथील चंदनउटी यात्रा आजही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते.ही परंपरा ह.भ.प. वासकर महाराज व त्यांच्या शिष्यपरंपरेतून पुढे चालत आली असून, नेवरे, नांदुरे, थोरले व धाकटे उंबरे, माळखांबी, बोरगाव, लवंग, श्रीपूर, आव्हे, पांढरेवाडी, आष्टी, जांभूड, कुरवली, शेळवे, देवडे, खेळवे आदी भीमा काठावरील गावांतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात.
        यंदा चैत्रवद्य निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१२ एप्रिल रोजी ह.भ.प. वडगावकर महाराज यांच्या भंडाऱ्याने व कीर्तनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. सोमवार दि १३ रोजी सकाळी विविध गावांतील मानकऱ्यांच्या दिंड्या अरण येथे दाखल होतील. रात्री उंबरेकर, माळखांबीकर, नांदुरकर व पांढरेवाडी येथील भाविकांकडून कीर्तन, गव्हळणी व जागर सादर करण्यात येणार आहे.
           मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी कुलकर्णी कुटुंबीय नांदुरकर यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चंदन दळण्याचा कार्यक्रम पार पडून जाधववाडीकर, करकंबकर मंडळी व इतर मान्यवरांच्या हस्ते चंदनउटी सोहळा होणार आहे. त्यानंतर चक्री भजन, काल्याचे कीर्तन, दहीहंडी, अभंग गायन व भारूड यांसारखे विविध भक्तिमय कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगणार आहेत. महाराष्ट्रभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे सचिव ॲड. विजय शिंदे व सावता रणदिवे यांनी केले आहे.
     दरम्यान, अरण येथील मूळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातील लोक इथे येऊन विसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप ॲड. विजय शिंदे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages