ग्रामीण पोलीस दलासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

ग्रामीण पोलीस दलासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

 ग्रामीण पोलीस दलासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण पोलीस दलामार्फत दि. १० एप्रिल २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, संवाद हॉल येथे आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षण Creative New Tech Limited या संस्थेतर्फे घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्यांचा वापर कसा करावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षणा दरम्यान सानिका निर्गुण (प्रोजेक्ट मॅनेजर), शक्तीसागर ढोले तसेच महेश काळोखे (प्रोजेक्ट मॅनेजर आपत्ती व्यवस्थापन) यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे विविध पैलू, उपकरणांचा योग्य वापर, तसेच प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तात्काळ व योग्य प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे असते. प्रशिक्षित मनुष्यबळ आणि योग्य साधनसामग्रीच्या सहाय्याने जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करता येते. अशा प्रकारचे प्रशिक्षण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत भर घालणारे ठरते.

सदर कार्यक्रम अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा शाखा, सोलापुर ग्रामीण कडील पीएसआय धनाजी ओमासे, ग्रेड पीएसआय सतीश शिंदे व महिला पोलिस हवालदार अंबरकर हे हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages