कोठे परिवाराचा सामाजिक वारसा अविरत
डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून साड्यांचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या ६२ व्या जयंतीचे औचित्य साधून सोलापुरात सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आला. स्व. विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तथा कोठेज गॅस्ट्रो केअर सेंटरच्या वतीने डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सम्राट चौक येथील महाबोधी बुद्धविहार येथे महिलांना साड्यांचे वाटप केले.
सामाजिक बांधिलकीतून उपक्रम या विशेष उपक्रमांतर्गत महाबोधी लेझीम संघाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील १,००० हून अधिक गरजू माता-भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक प्रथमेश कोठे आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सांगितले की, "कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. भविष्यातही कोणत्याही कार्यासाठी आम्ही जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू."
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाबोधी लेझीम संघाचे उत्सव अध्यक्ष सुजित शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. सतीश लोंढे यांनी स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आणि स्व. महेश अण्णा कोठे यांच्या राजकीय व सामाजिक आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली. मंडळाचे संस्थापक शांतकुमार नागटिळक आणि अमोल गोडसे यांनी कोठे परिवाराच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्याला उद्योजक वेंकटेश चिल्का, संतोष सोमा, राजुल, श्याम कुमार गंजी, प्रा. विठ्ठल लोहार, छत्रपती अवशेट्टी, विकी शेंडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment