भीम जयंती निमित्त सोलापूरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 11, 2026

भीम जयंती निमित्त सोलापूरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

 भीम जयंती निमित्त सोलापूरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        ही स्पर्धा दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत किल्ला बाग, सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये विभागण्यात आली आहे. गट क्रमांक १ मध्ये इयत्ता ५ वी ते ७ वीतील विद्यार्थी सहभागी होणार असून, गट क्रमांक २ मध्ये इयत्ता ८ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. गट १ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीचित्र हा विषय देण्यात आला आहे, तर गट २ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील कोणताही प्रसंग या विषयावर चित्र  काढावे लागणार आहे.स्पर्धेसाठी आवश्यक रंग, पेन्सिल व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे असून, कागद स्पर्धास्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी दोन तासांचा असेल. स्पर्धेचा निकाल दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिका आवारात जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९०४९१०२०१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांनी केले आहे.
      या स्पर्धेत दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3 , 2 व 1 हजार रुपये रुपये रोख तसेच ट्रॉफी, डॉ. आबेडकर यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक आणि सहभाग प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप राहणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकार डॉ. सचिन खरात यांच्याकडून ही बक्षिसे देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे विजेत्या स्पर्धकांना चित्रकार डॉ. खरात यांच्या चित्रकला शिबिराचा मोफत लाभ मिळणार आहे. सोलापूर शहरातील महापालिका क्षेत्र अंतर्गत असलेल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग राहणार आहे.
       या स्पर्धेच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीरचे चित्रकार डॉक्टर सचिन खरात हे थेट चित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चित्रकलेचा अविष्कार प्रत्यक्ष पाहता येणार आहे. ही एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.
         या पत्रकार परिषदेस महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात, पर्यवेक्षक सुरेश कासार, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages