पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

 पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यप्रशिक्षण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरातील ३५ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन व आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याकार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून प्रशिक्षणार्थींना दरमहा रुपये ९,००० इतके विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार पात्र असून शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशी असावी. पूर्णवेळ नोकरी करणारे किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र ठरणार आहेत. मात्र, ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवार पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत देण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in⁠� या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त आस्थापना व कंपन्यांनी या योजनेत सहभागी व्हावे.
नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
संकेतस्थळावर भेट देऊन “Login/Register” पर्याय निवडावा
“New User/Register Now” वर क्लिक करून मोबाईल क्रमांक नोंदवावा
प्राप्त OTP टाकून पडताळणी पूर्ण करावी
नवीन पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करावी
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे दूरध्वनी क्रमांक (०२१७-२९५०९५६) वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सोलापूर श्रीमती  संगीता खंदारे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages