सोलापूर उपविभागाची खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा सपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कृषी विभागातील उपविभागीय कृषी अधिकारी मोनापुर अधिनस्त मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, जगर सोलापूर तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मधारी यांची खरीप हंगाम पूर्व 2026 ची कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र क्षेत्र, बार्शी रोड सोलापूर येथे आज दिनांक २२ एदिल 2026 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तर प्रमुख पाहुणे सोलापूर केव्हीके चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मालासाहेब तांबडे हे होते. यावेळी बोलताना भोसले यांनी सांगितले की, येणा-या खरीप हंगामामध्ये विविध पंचवीस प्रकारच्या मोहिमा राबणेच्या आहेत. त्यातील महत्वाच्या मोहिमांधी प्रात्यक्षिके (Hands on Training) ही या कार्यशाळेमध्ये आयोजित केलेली आहेत. सदरील प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांनी स्वतः करून पहावयाची आहेत स्थातील कौशल्य, ज्ञान, माहिती आत्मसात करून येणाऱ्या खरीप हगामात शेतकन्यांना त्यांचे उत्पादन वाढीसाठी मोहिमांचे आयोजन करावे व खरीप हंगाम 2026 यशस्वी करप्न दाखवावा. डॉ. मालासाहेब लांब प्रमुख शास्त्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी संतुलित खताचा वापर, खत बचत, माती परीक्षण इत्यादी बाबत मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर देवेंद्र ढगे यांनी केले. प्रास्ताविकेमध्ये त्यांनी कार्यशाळेचा उद्देश व उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी शेतक-यासाठी hands on training ची प्रात्यक्षिके गाव पातळीवर आमोजित करणेबाबत क्षेत्रीय कर्मचारी यांना सूचना दिल्या, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी जगन्नाथ मगर यांनी सेंद्रिय शेती पद्धती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी शिवाजी आडके यांनी ऊस पिकातील सुपर केन नर्सरी बाबत मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड यांनी फार्मर कप स्पर्धेबाबत माहिती दिली. उमेदचे जिल्हा समन्वयक राहुल जाधव यांनी महिला बचत गटाच्या शेतकन्यांनी फार्मर कप मध्ये सक्रीय सहभाग घ्यावा याबाबत अवाहन केले. या कार्यशाळेमध्ये विविध तांत्रिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण कौशल्य आत्मसात करण्यासाठी उपविभागातील दक्षिण, अक्कलकोट, उत्तर, मोहोळ सानुक्यातील एकूण 14 मंडळ कृषी अधिकारी यांनी त्यांचे उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांची टीम स्थापन करून विविध मोहिमा अंतर्गत प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी उत्तर सोलापूर यांचेकडे उसाचे सुपर केन नर्सरी, माम्नज मंडळ कडे जनतारा प्रकल्प, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंडळ दक्षिण यांनी दशपर्णी अर्क तंत्रज्ञान, मंदूप मंडळ कृषी अधिकारी यांनी हुमणी किड निमंत्रण, वळसंग टीम यांनी सीआरएफ पद्धतीने फळबाग लागवड तंत्र, बोरामणी टीम यांनी सेंद्रिय खते प्रकार व वापर, मोहोळ तालुक्यातील मोहोळ मंडळ कृषी अधिकारी यांनी सेंद्रिय कीडनाशक अग्निअस्वचा वापर, नरखेड मंडळ मानी बीबीएफ संवाद्वारे पेरणी तंत्रज्ञान, कुरु मंडळ यांनी जीवामृत तयार करणे, पंनुर टीमने ब्रम्हास्त्र जैविक कीडनाशकचे प्रात्यक्षिक केले, अक्कलकोट तालुक्यांमधील मंडळ कृषी अधिकारी टीमने बीज प्रक्रिया मोहीम, अवकलकोट मंडळ यांनी बियाणे उगवण चाचणी, तडवळ मंडळ माती नमुना काढणे, तर मैदगी मंडळ यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हा मृद चाचणी व मृद सर्वेक्षण प्रयोगशाळाचे आनंद भौग यांची टीम यांनी माती नमुना कधी व कसा काढावा या बाबत प्रात्यक्षिक केले. अशा पद्धतीने विविध 15 टीमने खरीप हंगामात राबवण्याच्या मोहीमांचे प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण हे उपविभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी माना दिले सदर कार्यशाळेस तानुका कृषी अधिकारी अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर ये तालुका कृषी अधिकारी सी. एस. मंगरुळे, हर्षद निगडे, अवधूत मुळे, रामचंद्र माळी हे उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर, बाळासाहेब लांडगे व कुर्डवाडी उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे उपस्थित होते. सदर कार्यशाळेत तामुका कृषी अधिकारी सी. एस. मंगस्यो, हर्षद निगडे, अवधूत मुळे, तसेच केव्हीके सोलापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. समाधान जवळगी, डॉ. अमोल शास्त्री, विकास मिसे उपस्थित राहिले सूरसंचालक केव्हीके चे शास्त्रज्ञ प्रदीप मोजारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी केले.
No comments:
Post a Comment