NSDC मार्फत इस्राईलमध्ये "Renovation Construction" क्षेत्रात रोजगाराची संधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या माध्यमातून इस्राईल येथे "Renovation Construction" क्षेत्रात विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
उपलब्ध पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
१) Plastering Work – १००० जागा
२) Ceramic Tiling – १००० जागा
३) Drywall Worker – ३०० जागा
४) Mason – ३०० जागा
या संधींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ५० वर्षे दरम्यान असावे तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. उमेदवाराचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या कार्यरत नसावीत किंवा तेथे रहिवासी नसावेत, अशी अटही लागू आहे.
या रोजगार संधींबाबत सविस्तर माहिती https:// maharashtrainternational.com� या संकेतस्थळावर "Latest Jobs" या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
तसेच, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन या रोजगार संधींची माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोर्ट, पार्क चौक, सोलापूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (०२१७) २९९२९५६ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सोलापुर श्रीमती संगीता खंदारे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment