एस टी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

एस टी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी

 एस टी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी

खंडाळी (कटूसत्य वृत्त):- २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळी पाटी जवळ एक दुचाकी क्रमांक MH 13 CX 2533 महामार्ग ओलांडताना येणारी वाहने न बघता गाडी पुढे घेत असताना सोलापूर वरून पुण्याकडे जात असलेल्या एका एस टी बस क्रमांक MH 09 EM 1295 समोर अचानक आल्यामुळे एस टी बस ने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक  दुचाकीस्वार व्यक्तीच्या डोक्याला मार लागून जखमीं झाला असून सदर अपघातामध्ये जखमीं झालेल्या व्यक्तीला देवडी येथील खासगी वाहनातून मोहोळ येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक डॉ महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक नागनाथ भालेराव तसेच ग्रस्तीपथक प्रमुख संतोष खडके ग्रस्तीवाहनचालक अभिजित गुजरे, सहाय्यक विनोद भोसले आणि मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार (PSI) आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत निवृत्ती थोरात वय ६५ वर्ष, रा देवडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षिरसागर यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल नाका येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages