सोलापूरात सुरू होणार इलेक्ट्रोपॅथी, इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून तोंडाचा कॅन्सर, हृदयाशी संबंधित कॅन्सर तसेच इतर विविध प्रकारच्या कॅन्सरने अनेक नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी केवळ वयोवृद्धांमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कॅन्सरग्रस्त रुग्णांना पर्यायी उपचारपद्धती उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरात लवकरच भव्य इलेक्ट्रोपॅथी व इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉक्टर संतोष राठोड आणि डॉक्टर सुनील वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजापूर रोड परिसरातील युवराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे सेंटर कार्यान्वित होणार असून, याबाबत माहिती देताना डॉ. संतोष राठोड यांनी सांगितले की, कॅन्सर ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली समस्या असून रुग्णांना सुलभ, नैसर्गिक व परवडणारे उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याच उद्देशाने हे संशोधन व उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रोपॅथी ही पूर्णतः वनस्पतींच्या अर्कावर आधारित उपचारपद्धती असून या औषधांना दुष्परिणाम नसल्याचा दावा करण्यात येतो. ‘कोहोवेन’ पद्धतीने तयार होणाऱ्या औषधांद्वारे वनस्पतीतील जैवऊर्जा (बायो एनर्जी) शरीरात पोहोचवली जाते व त्यामुळे शरीरातील विविध विकारांवर परिणामकारक उपचार होतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच इलेक्ट्रो होमिओपॅथी पद्धतीमध्ये कॅन्सर रुग्णांना ऑपरेशन, किमोथेरपी किंवा रेडिएशनची आवश्यकता भासत नाही, असा दावा करण्यात येत आहे. ही उपचारपद्धती शरीरातील अशुद्ध रक्त व द्रव्ये शुद्ध करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्यामुळे कॅन्सरसह इतर गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येते, असा दावा या डॉक्टरांनी केला आहे.
डॉ. संतोष राठोड व डॉ. सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी डॉक्टरांची टीम या केंद्रात कार्यरत राहणार असून कॅन्सर रुग्णांना योग्य सल्ला, मार्गदर्शन व माफक दरात उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सोलापुरातील तसेच परिसरातील कॅन्सर व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी विजापूर रोड येथील युवराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन या उपचारपद्धतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसांत या अत्याधुनिक व रुग्णहितकारी केंद्राचे भव्य उद्घाटन होणार असल्याची माहितीही देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस ॲड. शिवशंकर घोडके, विजय शाबादे उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment