सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका

 सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- युद्धामुळे थांबलेली निर्यात, देशांतर्गत बाजारातील घटलेली मागणी, शिपमेंटचे पाच पटीने वाढलेले चार्जेस, कच्च्या मालाची प्रचंड महागाई या प्रकाराने सोलापूरच्या वस्त्रोद्योगास अंदाजे ५०० ते ७०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

युद्ध पंधरवड्यापेक्षा अधिक लांबल्याने वस्त्रोद्योगावर देखील वाईट स्थिती आली आहे. याचा थेट परिणाम कामगारांच्या रोजगारावर होण्याची भीती आहे.

शहरातील वस्त्रोद्योगात अनेक प्रकारची उत्पादने घेतली जातात. यामध्ये सोलापुरी चादरी, टेरी टॉवेल, युनिफॉर्म, गारमेंट, होजिअरी, इथिनिक व फॅन्सी वेअर्स आदी उत्पादनांचा समावेश आहे. युद्ध लांबल्याने अनेक प्रकारचे परिणाम समोर आले आहेत. पॉलिस्टर व पॅकिंग मटेरियलचे भाव ३५ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे उत्पादन निर्मितीचा खर्च वाढला. निर्यातीच्या बाबतीत युद्ध थांबेपर्यंत निर्यातदार एजंट कोणत्याही नव्या ऑर्डर स्थानिक उत्पादकांकडून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे करोडो रुपयांचे उत्पादन ठप्प झाले आहे. आखाती देशातील कतार, ओमान, युएई, ईराण, इराक, सौदी अरेबिया, बहरीन या देशातील निर्यात पूर्णपणे थांबली आहे.

उत्पादननिहाय अडचणी

सोलापुरी चादर ः यंत्रमागधारक उद्योजकांकडून सोलापुरी चादर तयार केली जाते. या चादरीच्या उत्पादनावर देखील युद्धाचे सावट पसरले आहे. पेरॉक्साईड, रंग, पॅकिंग प्लॅस्टीक मटेरियलचे वाढलेल्या भावाचा उत्पादनास फटका बसला आहे.

टेरी टॉवेल ः टेरी टॉवेलच्या निर्यातीवर युद्धाचे सावट आहे. युद्धातील धोका म्हणून शिपमेंटचे चार्जेस पाच ते सहा पटीने जास्त घेतले जात आहे. त्याचा फटका उत्पादकांना बसतो आहे. आखाती देशातील एकूण निर्यातीच्या अंदाजे १५ ते २० टक्के निर्यात थांबली आहे.

युनिफॉर्म ः आफ्रिका व अन्य देशातील युनिफॉर्मच्या निर्यातीच्या बाबतीत वाहतुकीच्या अडचणी आहेत. निर्यातदार एजंट उत्पादकांचा माल युद्धामुळे खरेदी करण्यास तयार नाहीत. तसेच कच्च्या मालाचे दर वाढल्याने देशांतर्गत असलेली मागणी पुरवताना जादा दराचा फटका उद्योगाला बसला आहे.

कच्च्या मालाच्या महागाईचा भडका

कापड उद्योगात युद्धामुळे पेट्रोलियम उत्पादनाचा बेस असलेल्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत.

पेरॉक्साईडचे दर ३३ रुपये होते ७० रुपये झाले

पॅकिंग प्लास्टिक १०० रुपये किलो होते ते आता २०० रुपये किलो झाले आहे

रंगाचे भाव ६०० रुपये किलो होते ते १ हजार रुपयांवर गेले आहेत.

पॉलिस्टर सिंथेटिक यार्नची किंमत २० टक्क्यांनी वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages